Kapil Sahasrabudde दोन - तीन महिन्यांपुर्वी आंध्र प्रदेशातील ओंगोल जिल्ह्यात गेलो होतो. याचे नावच मुळी तिथल्या ओंगोल नावाच्या गाई वरून दिले गेले आहे. ४५-४८ डिग्री तापमानात पण ही गाय रहाते. एकदम काटक. दूध पण बर असत आणि मुख्य म्हणजे बैल एकदम भारी असतात शेतकामाला. तिथेच अजून हे दोन स्थानिक जातीचे पशु दिसले. एक नेल्लोर जातीची मेंढी आणि एक कोंबजा. याला गावरानच म्हणतात. नाल असेल पण समजले नाही. झुंजी साठी पाळतात. हे पण त्याच अति उष्ण प्रदेशात रहातात. भारतातील प्रत्येक भागात त्याला साजेसे पाळीव पशु आहेत. सह्याद्रीतील डांग, अकोले परिसरात डांगी गाय आहे जी ३००० मिमि पावसात राहू शकते आणि तीव्र उताराच्या शेतीत काम करू शकते. आपल्या प्रत्येकाच्या भागात असे पाळीव पशु पक्षी आहेत. दुर्दैवाने विकते तिथे पिकत नाही या न्यायने त्यांची किंमत नाही. म्हणुनच दुध उत्पादन हा एकच पर्याय ठेऊन गायींच्या संकरीकरणाचा कार्यक्रम राबवतो आपण. पण या स्थानिक पशुं बरोबर मात्र काही काम होत नाही.जर भारताची ही धरोहर राहीली नाही तर कुठली संस्क्रुती टिकवायची चर्चा करतो आपण???

No comments:
Post a Comment